PostImage

Chunnilal kudwe

July 30, 2024   

PostImage

जि. प. प्राथ.शाळा कवडसी ( डाक ) येथे वृक्षारोपण


शिक्षन विभागामार्फत शिक्षण सप्ताह

चिमूर - 
        महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षण सप्ताह साजरा केला जात आहे.या सप्ताहाचे औचित्य साधून जि.प.प्राथ.शाळा कवडशी (डाक) येथे वृक्षारोपण करण्यात आले. एक मुल एक झाड याप्रमाणे शाळेच्या प्रांगणात, परिसरात,शेताच्या बांधावर आंबा,  फणस, चिकू, चिंच, वड, पिंपळवृक्ष, इत्यादी फळझाडे, गुलाब,कृष्णकमळ, शेंवती, मोगरा, सदाफुली आदी फुलझाडे, तुळस,अडूळसा, पानफुटी, कोरफड आदी औषधी वनस्पती, वांगी,टमाटर,दोडका,चवळी शेंगा, लौकी आदी भाजीपाला, सांबार, पालक ईत्यादी पालेभाज्याचे रोपण करण्यात आले. वृक्षलागवड करून संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली.प्रधानमंत्री पोषण आहार योजना यामूळे प्रभावी होईल असे प्रतिपादन सहाय्यक शिक्षिका कविता लोथे यांनी केले. तर वृक्षांवर माया कराल तर ते आपल्याला भरभरून देतात असे मुख्याध्यापक धनराज गेडाम यांनी सांगितले. 
      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळाव्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, पालक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.शि. कविता लोथे, मुख्याध्यापक धनराज गेडाम व आजी-माजी विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 16, 2023   

PostImage

Rotary festival - सोमवार पासून चिमूर क्रांती भूमीत रोटरी उत्सव


समाज प्रबोधन, विवीध कार्यक्रम स्पर्धा, नृत्य, खेळ कार्यक्रमाचे आयोजन


       दिवाळी उत्सवाच्या निमीत्ताने सामजीक बांधीलकी जपत रोटरी क्लब चिमूरच्या वतीने पहिल्यांदाच चिमूर क्रांतीभूमीत दिनांक २० नोव्हेंबर सोमवार ते २५ नोव्हेंबर शनीवार पर्यत सहा दिवसीय रोटरी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन बिपीएड ग्राऊंड, आदर्श विद्यालय, संविधान चौक वडाळा ( पैकु ) चिमूर येथे करण्यात आले आहे.


        मागील अनेक वर्षापासुन चिमूर येथील रोटरी क्लब सामाजीक बांधीलकी जपत पर्यावरण, आरोग्य, शिक्षण या विषयी जनजागृती करून शिबीर राबवीले आहे. रोटरीने असहाय्य अशा व्यक्तीना मदतही केली आहे. रोटरी काय आहे ? रोटरी नेमकं समाजासाठी काय करते हे पटवून देन्याच्या उद्देशाने चिमूर क्रांतीभूमीत रोटरी उत्सवा निमीत्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले आहे. सोमवार पासून उत्सवाला सुरुवात होनार आहे. या पाच दिवसीय रोटरी उत्सव कार्यक्रमात नृत्य व विवीध स्पर्धा, रॉक बँड, फॅशन शो व विवीध खेळ, समूह नृत्य स्पर्धा व एड्स जागृतीवर पथनाटय, उत्पादनाची विशाल प्रदर्शनी, सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आकाश पाळना, झुले, ड्रगन, मौत का कुआ, रेलगाडी व विवीध प्रकारचे मनोरंजन, स्वादिष्ट पदार्थांचा दिलखुलास स्वाद, शाळेतील विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा, नृत्य, गायन, व्यक्ती महत्व विकास, महिला व युवतींसाठी विवीध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


      रोटरी उत्सव कार्यक्रम सहा दिवस राहनार आहे. तरी परिसरातील नागरीकांनी या रोटरी उत्सवात सहभाग दर्शवून लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष रोटे वैभव लांडगे तथा रोटरी क्लब चे रोटे पदाधिकारी यांनी केले आहे.